Program Schedule

कार्यक्रम


वेळ


तपशील


प्रभातलहरी सकाळी  ९:०० ते ९:४५ उत्तररंगच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न आणि मंगलमय करण्यासाठी डॅलसच्या स्थानिक कलाकारांचा प्रभातगीतांचा कार्यक्रम

गायक: प्रिया पाडळीकर, अमित केळकर, निवेदन: कांचन कुलकर्णी

साथसंगत: राजीव परांजपे, प्रसाद जांभेकर, प्रशांत लळीत, डॉ. मोहन केतकर

(स्लाईड्स: मनोज जोशी)

उर्जा एका प्रेरणेची सकाळी ९:४५ ते १०:३० ह्या वर्षीच्या उत्तररंगचे प्रमुख पाहुणे पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज बी. जोशी यांच्याशी संवाद.

विषय: निवृत्तीनंतर कार्यरत राहून समाजाबरोबरच स्वतःलाही कसे समृद्ध करावे

आव्हाने, समस्या आणि उपाय सकाळी १०:३० ते १२:३० आयुष्याच्या उत्तरार्धातील विविध शारीरिक आव्हाने, येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय यावर तज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र आणि प्रेक्षकांशी संवाद – प्रश्नोत्तरे. सहभाग:

डॉ. दिलीप जेस्ते (Dementia)

डॉ. अजेय जोशी (Pain Management)

डॉ. नीला पटेल (Geriatrics)

डॉ. उल्का नातू-गडम (Importance of Yog in modern medicine)

भोजन दुपारी १२:३० ते १:३०
वय मोठं गंमतीचं दुपारी १:३० ते २:१५ उतारवयातील गमतीजमती शब्दबद्ध करण्यासाठी आयोजित लघुलेख स्पर्धेतील निवडक ३ लघुलेखांचे विजेत्यांकडून अभिवाचन
हास्यसंजीवनी दुपारी २:१५ ते ३:१५ हास्याचे आणि विनोदाचे प्रकार, महत्त्व, मान्यवरांचे विनोदी किस्से, विडंबन काव्य, वात्रटिका, संत साहित्यातील विनोद यांनी गुंफलेला संवादात्मक कार्यक्रम

सादरकर्त्या: दिपाली केळकर, मुंबई

Living In Style दुपारी ३:२० ते ४:२० अमेरिकेत व भारतात खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या निवासयोजना तसेच निवृत्तीनंतरच्या नियोजनावरचा श्री. अशोक आणि विद्या सप्रे यांचा माहितीपूर्ण कार्यक्रम
गौरवरंग दुपारी ४:२० ते ४:४५ अमेरिकेतील विविध शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्लबचा गौरव. तसेच ह्या क्लबची रचना आणि त्यांचे कार्य याबद्दल ऐकुया त्यांच्याच सभासदांकडून