बीएम्एम् २०१९ च्या स्मरणिकेचे नाव सुचविण्यासाठी आम्ही एक स्पर्धा आयोजली होती. आम्हाला जाहीर करायला अतिशय आनंद होत आहे की डेट्रोईटचे श्री. सुशांत खोपकर यांनी सुचविलेल्या “गुंजन” या नावाची निवड झाली आहे. श्री. खोपकर यांचे लेखन आणि नाटक हे छंद आहेत आणि यापूर्वीच्या बीएम्एम् अधिवेशनात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.

श्री. सुशांत खोपकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सुशांत खोपकर हा सध्या डेट्रॉईट, मिशिगनचा रहिवासी असून तो मूळचा पुण्याचा आहे. सुशांत पेशाने डेटा सायंटिस्ट आहे. लेखन आणि नाटक हे त्याचे छंद आहेत. BMM २०१७ च्या ‘रंग मराठी मनाचे’ या ओपनिंग सेरेमनीची स्क्रिप्ट त्यानेच लिहिली होती. सुशांतने ‘प्रयाणोत्सव’ नावाचं २ अंकी नाटक लिहिलं असून तो BMM २०१७ च्या स्मरणिका टीमचा सदस्यदेखील होता.

स्मरणिकेसाठी साहित्य पाठवा

अधिवेशनाच्या स्मरणिकेसाठी आपल्याकडून साहित्य मागवीत आहोत! उत्तर अमेरिकेतील मराठी जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरील साहित्य आपल्याकडून हवे आहे. सामाजिक/आर्थिक/शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या मराठी बांधवांची माहिती देणारे लेख अपेक्षित आहेत. प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या पण निरलसपणे समाजकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांची माहितीही संकलित करायची आहे. तर मग, उचला आपली लेखणी आणि करा आपल्या प्रतिभेचा आविष्कार! ललित, स्फुट, प्रवासवर्णन, विचारप्रवर्तक लेख, कविता या प्रकारचे साहित्य प्राधान्याने स्विकारले जाईल. साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहीर होण्याची वाट न बघता, आपले साहित्य आपण पाठवायला सुरुवात करू शकता!

स्मरणिकेच्या साहित्यासाठी नियम व अटी
 • साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : फेब्रुवारी १५२०१९.
 • आपले साहित्य Google Input Tool (https://www.google.com/inputtools/try/) मध्ये टाईप करून Word आणि Pdf या दोन्ही स्वरूपात पाठवावे.
 • फक्त स्वतः लिहिलेले आणि इतर कुठल्याही माध्यमाद्वारे प्रसिद्ध न केलेले साहित्य पाठवावे.
 • साहित्य स्मरणिका समितीकडे दिल्यावर कृपया इतर कुठल्याही प्रसिद्धी माध्यमाकडे (बदल करूनही) पाठवू नये.
 • साहित्य पाठविताना कृपया ७५० शब्दांची मर्यादा पाळावी.
 • मराठी किंवा इंग्रजी भाषेतील साहित्य स्वीकारले जाईल.
 • विनोद अथवा पाककृती पाठवू नये.
 • साहित्य निवडीचा व संपादित करण्याचा पूर्ण अधिकार स्मरणिका समितीकडे असेल.
 • साहित्य निवडीबद्दलचा निर्णय समिती आपल्याला कळवेल.
 • साहित्य पाठवताना आपला चालू स्थितीतील ई-मेल address काळजीपूर्वक निवडा.
 • साहित्य पाठवल्यावर साहित्याचे सर्व हक्क २०१९ बृ.म.मं. स्मरणिका समितीकडे रहातील.

SUBSCRIBE TO BMM2019 NEWSLETTER

BECOME A VOLUNTEER OF BMM2019