September 2018

नमस्कार मंडळी,

बृ. म. मं. अधिवेशनाला आता एका वर्षांहूनही कमी अवधी उरलेला आहे. हा काळही हा हा म्हणता सरून जाईल! या ऑगस्ट महिन्यात मात्र उत्साहाचे विशेष वातावरण निर्माण झाले आहे ते विविध स्पर्धांच्या घोषणांमुळे! फेसबुकवर तर रोज नवनवीन घोषणा होत आहेत आणि दरदिवशी नवीन काय याची उत्सुकता सर्वांनाच लागत आहे.

कुठलीही स्पर्धा म्हटली की जिंकणं हरणं आलंच पण त्याहूनही अधिक आनंदमय अनुभव म्हणजे आपली कला आपल्या बरॊबरच्या कलाकारांबरॊबर प्रदर्शित करणे, मातब्बर मंडळींकडून मार्गदर्शन मिळवणे, आणि प्रेक्षकांची दाद मिळवणे. मराठी कलासंस्कृती पुढल्या पिढीपर्यंत अमेरिकेत पोहोचवण्यासाठी अशा व्यासपीठाची गरज आहे. ह्या उद्देशानेच विविध स्पर्धांचा आम्ही हा उपक्रम ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने हाती घेतलेला आहे. नृत्य-संगीत-चित्रकला-फोटोग्राफी यासारख्या कलांचा आविष्कार करण्याची सुवर्णसंधी आपणा सर्वांना यातून मिळणार आहे. बीएमेम २०१९ च्या वेबसाईटवर आणि फेसबुकवर यासंबंधी विशेष माहिती मिळत राहणार आहे.ढोलताशा आणि सामूहिक नृत्य स्पर्धांच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात झालेलीच आहे. इतर स्पर्धांच्या प्रवेशिका स्वीकारण्यास लवकरच सुरुवात होईल. तेंव्हा तारखांवर लक्ष ठेवा आणि आपले कलागुण सिद्ध करायच्या तयारीला लागा. आपल्या परिचितांमध्येही गुणवान कलाकार असतीलच! त्यांच्याही कानावर ही माहिती जाऊ द्या.

एकंदर चार स्पर्धा आणि दोन ज्युरीड प्रदर्शने घोषित झाली आहेत, ती पुढीलप्रमाणे :

स्पर्धा : १) सारेगम (गायन)            २) व्वा उस्ताद ( शास्त्रीय संगीत गायन)

         ३) नृत्य रंग ( सामूहिक नृत्य)   ४) आमची भाषा, ढोलताशा ( ढोलताशा)

प्रदर्शने : १) रंग माझा वेगळा (चित्रकला)  २) टिपलेले क्षण ( छायाचित्र कला)

प्रसिद्ध संगीतकार श्री. अशोक पत्की यांनी आपल्या अधिवेशनाचे घोषवाक्य त्यात स्वरबद्ध केले आहे आणि श्री. सुरेश वाडकर, श्री. हृषिकेश रानडे, माधुरी करमरकर यांसारख्या मातब्बर गायकांचा आवाज त्यासाठी लाभला आहे. विविध स्पर्धांचा उल्लेखही त्यात आकर्षक पद्धतीने केला आहे. https://www.youtube.com/watch?v=2zMZFv4kcOc&feature=youtu.be

या वेबसाईटवर हा व्हिडीओ जरूर पहा.

स्पर्धांबरोबर इतर समित्यांचेही काम जोरात सुरु आहे. या वृत्तात मात्र स्मरणिका आणि CME या समित्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत आहोत.

स्मरणिका – अधिवेशनाच्या सर्वच समित्या खूप कार्यरत आहेत. स्मरणिका समितीने स्मरणिकेचे नाव आणि मुखपृष्ठ यासाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. सर्वांच्या हातभारातून स्मरणिकेची उत्तम निर्मिती होऊ शकते यावर आमचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच अधिवेशनाच्या स्मरणिकेसाठी आपल्याकडून साहित्य मागवीत आहोत! उत्तर अमेरिकेतील मराठी जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरील साहित्य आपल्याकडून हवे आहे. सामाजिक/आर्थिक/शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या मराठी बांधवांची माहिती देणारे लेख अपेक्षित आहेत. प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या पण निरलसपणे समाजकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांची माहितीही संकलित करायची आहे. तर मग, उचला आपली लेखणी आणि करा आपल्या प्रतिभेचा आविष्कार! ललित, स्फुट, प्रवासवर्णन, विचारप्रवर्तक लेख, कविता या प्रकारचे साहित्य प्राधान्याने स्विकारले जाईल. साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहीर होण्याची वाट न बघता, आपले साहित्य आपण पाठवायला सुरुवात करू शकता!

CME  – The BMM2019 CME committee has been working all through Spring and Summer to brainstorm about topics, speakers, and CME accrediting bodies. The University of North Texas (UNT) CME office to provide us with the required credit for our program to be held on Thursday, July 11, 2019.  The CME contract with UNT is under review. Once it is approved and signed,  we will start the work of CME accreditation with UNT officials.

The program for the CME day has been outlined and the topics like mood disorders and depression, Parkinson’s disease, diagnosis and management, diabetes, cardiovascular risks, drug interactions and dangers of herbal medication, Opioid crisis, preventive and social medicine, are being planned. The speakers are renown experts in their respective fields and we are sure that medical professionals in our Marathi community will take this opportunity to earn approximately 6.4 CME credit hours at this convention besides listening on these interesting topics.

गेल्या महिन्याच्या वृत्तात देणगीदारांना आवाहन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही व्यक्तिशः फोन करून नेहमीच्या देणगीदारांना अधिवेशनाला आमंत्रित केले. ‘हे व्यक्तिगत आमंत्रण अतिशय आपुलकीचे वाटले’ असे मत बऱ्याच देणगीदारांनी व्यक्त केले आहे. सर्व देणगीदाराचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. 

येत्या दोन आठवड्यांतच गणरायाचं आगमन होणार आहे. मंडळांचे गणेशोत्सव कार्यक्रम सुरु होतील. तेंव्हा आपणां सर्वांना गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही मंडळांच्या भेटी आम्ही घेणार आहोत तर भेटू लवकरच. 

धन्यवाद!

मंजिरी जोशी.