BMM 2019 Programs from North America

८६ वर्षीय डॉ. वसंत चापनेरकर १२६ देश फिरले आहेत आणि या वयातही स्वतः ला फिट आणि आनंदी ठेवत अजूनही विश्व भ्रमंती करत असतात. अशा आनंदी जीवनाचं रहस्य काय हे त्यांच्याच शब्दात ऐकुया “Live stress free with statistics and numbers” या कार्यक्रमामध्ये.
आपलं मानसिक आणि शारीरिक संतुलन सांभाळण्यासाठी शरीरातील चक्रांचे फार महत्व आहे.  ही चक्रे, त्यांची सखोल माहिती आणि त्यांचं महत्व उलगडून सांगणारं एक व्याख्यान घेऊन येत आहेत सौ. मंजू जोशी.
वेळेची गुंतवणूक करा आणि हे व्याख्यान ऐकायला नक्की या!
शब्दांना थोडा विसावा देत, बासरी, तबला, सतार ,की बोर्ड , गिटार , ड्रम्स, अशी देशी विदेशी वाद्द्यांच्या साथीने संवाद साधण्यासाठी ऑस्टिन चा  “नादब्रह्म” हा वाद्य संगीत बँड घेऊन येत आहेत, एक अनोखा कार्यक्रम “शब्देविण संवादु”!
रूढ कथांतील प्रश्नांसवे उलगडत जाणारी, संगीत, नृत्य आणि नाटक यांचा नेत्ररोचक मेळ साधणारी,  ऑस्टिनच्या कलाकारांतर्फे एक सर्वस्वी नवी कलानुभूती – अलिखित पानांची कहाणी!
50th show of a Marathi Stand Up Comedy – Ubhya Ubhya Vinod. The show has been a highlight of BMM Conventions since 2005 with a houseful show every time! Fresh material is presented by the comics from various states in USA enjoyed by the entire demographic spectrum. Come and join the laugh riot!
 Dramatic adaptation of the famous book ‘Batatyachi chal’ by legendary writer Pu La Deshpande with an ensemble cast of 40 on the backdrop of a rundown chal by New Jersey’s Theatrix group.
अधिवेशनातील नाट्यसंगीताच्या कार्यक्रमांची परंपरा पुढे नेत BMM2019 मध्ये सादर होत आहे स्त्रीभूमिकांनी अजरामर केलेल्या नाट्यगीतांचानजराणा.
“आम्हा घरी धन” – एक दृक-श्राव्य-नृत्याविष्कार !”
अभंग म्हणजे जे भंग पावत नाही ते. हा काव्य-प्रकार फक्त देवा-धर्मांपुरता मर्यादित नाही. तो तुमच्या-आमच्यात अनादी-अनंत काळापासून नांदतो आहे.  त्याचीच दृक-श्राव्य-नृत्य अनुभूती सादर करण्याचं आव्हान अटलांटातल्या “अमेरिकन युवा” आणि तरुण वर्गाने अगदी लीलया पेललं आहे.
The Big Bang Theatre of Kansas City has put together a spectacular show which will take the audiences back to the golden age of Marathi theater. They are presenting a play Premachya Gava Jave (PGJ) written by the famous Marathi play writer Shri. Vasant Kanetkar. It is a light comedy family drama centered on the theme of ‘generation gap’.
स्वातंत्र्यवीर सावरकर ह्च्या असामान्य कार्याचा मागोवा घेत असता, स्वगतं व निवेदनासह त्यांच्या उत्कट कवितांवर नृत्याविष्कार करण्याचा हा अनोखा प्रयत्न!  तंजावूर नृत्यशाळा सिऍटल् सादर करीत आहे,
“अनादि मी अवध्य मी”!
Staging the frames of semi classical and folk dances of India on music from Marathi and Bollywood films showcasing the folk and cultural flavors of India. Brought to you by the talented dancers of Bay Area with renowned choreographer guru Deepali Vichare and our favorite actor/director Subodh Bhave.
भक्ती, उत्साह, लोककला, संगीत आणि संस्कृती या सर्वांचा उत्कट सोहळा म्हणजे वारी. परदेशात राहून आपल्यासारख्या अनेक जणांना या वारीच्या अनुभवाला मुकावे लागते. ही उणीव भरून काढण्यासाठीच ‘वारी पंढरीची’ हा कार्यक्रम दिंडी, भजन, भक्तिगीते, भारूड आणि माहितीपूर्ण निवेदन यांच्याद्वारे ‘आषाढी वारी’ थेट अमेरिकेमध्ये घेऊन येतो.