“* Programs from India to be finalized based on approval of US visa for the artists/teams. Listed programs are subject to change.”

आजोबा आणि नाती मधल्या उत्कट नात्या वर आधारलेले नाटक, “डियर आजो”!!!

 

ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेकर त्यांच्या सुमधुर आवाजात आपल्या अधिवेशनात सादर करणार आहेत जुन्या नवीन गाण्यांचा  बहारदार कार्यक्रम.
प्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार श्री. अशोक पत्की यांची ओळख आपल्याला द्यायला नकोच! त्यांचाच शब्दात, आणि संगीतात, त्यांच्या सप्तसुरांची गोष्ट आपल्याला अनुभवता येईल, BMM २०१९ मध्येच!!
संगीत क्षेत्रात वसंत फुलवणारे , पं. वसंतराव देशपांडे .. रसिकांवर स्वराभिषेक करणारे ,पं जितेंद्र अभिषेकी..  नावाप्रमाणेच ज्यांचं गाणं ताजं, टवटवीत आहे , अशा गानसरस्वती किशोरी आमोणकर.. संगीत क्षेत्रातील या नक्षत्रांना मानवंदना देणारा कार्यक्रम ‘स्वरनक्षत्रं ‘
भेट सर्वानाच  हवीहवीशी वाटते. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या भेटीतून मिळणारा आनंद तर आगळाच असतो. अचानक झालेल्या भेटीत तर आणखीनच मजा असते. तर आपल्या भेटीसाठी येत आहेत दिग्गज कलाकार – भेटीत गुप्तता मोठी हा कार्यक्रम घेऊन.
कालिदासाचे सर्वांग सुंदर खंडकाव्य मेघदूत – त्याची ही कथा; मेघाचा प्रवास, अलकागरीच सौंदर्य हे पाहतानाच त्यातली रंगसंगती, शब्दलालित्य, कल्पनांचा बहर. थोडक्यात या काव्याचा रसास्वाद साध्या सोप्या मराठी शब्दात मांडणारं हे कथन…
डॉ दीक्षित यांचं  “विनासायास Weight Loss आणि मधुमेह प्रतिबंध” या विषयावरचं व्याख्यान अमेरिकेत प्रथमच!
हृषिकेश जोशी सादर करीत आहेत “Just असंच”, जगात भेटलेल्या माणसांचे इरसाल नमुने – त्यांच्या नेहेमीच्या तुफान विनोदी खुमासदार शैलीत.
आपल्या सर्वांचा एक छोटा मित्र – पण मिष्किलपणामध्ये याचं नाव मोठं! BMM २०१९ मध्ये आपल्यासाठी खास कार्यक्रम – “चिंटू तुमच्या भेटीला”
डॉ. अरुणा ढेरे सादर करणार आहेत पु ल आणि सुनीताबाई यांच्या आवडत्या कवितांचा कार्यक्रम.
सादर करीत आहोत “सुबोध भावे सोबत रुबरू”! मग येताय ना सुबोधच्या प्रत्यक्ष भेटीसाठी?
आयुष्य कसे जगावे, असे सांगणारे एक NON-आध्यात्मिक प्रवचन… ज्ञान, आध्यात्म, मनोरंजन आणि प्रबोधन यांचा अपूर्व संगम!! डाॅ. संजय उपाध्ये यांच्या सोबत दोन तासांची दर्जेदार हास्य दंगल!!
मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे आणि समृध्दी दाखवणारा अप्रतिम कार्यक्रम – “शब्दांच्या गावा जावे”.
सदारकर्त्या – दीपाली केळकर

भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तने समाधान होये ।

बहुत जनासी उपाये । हरिकीर्तन कलयुगीं ।।

“* Programs from India to be finalized based on approval of US visa for the artists/teams. Listed programs are subject to change.”