बृ.म.मं. २०१९ अधिवेशन - स्मरणिका

नाव आणि मुखपृष्ठ स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख - २९ ऑगस्ट २०१८.

नाव आणि मुखपृष्ठ चित्र स्पर्धा

आपल्या अधिवेशनाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य तुमच्यापर्यंत पोहोचले आहेच. अधिवेशनाच्या स्मरणिकेचे काम आता सुरु झाले आहे. स्मरणिकेचे महत्वाचे घटक म्हणजे "नाव" आणि "मुखपृष्ठ". या दोन्हीसाठी आम्ही स्पर्धा आयोजित केली आहे! अधिवेशनाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य ह्यांना अनुसरून स्मरणिकेचे यथार्थ नाव आणि एक सुंदर मुखपृष्ठ चित्र तयार करून जगात सर्वत्र मराठी घराघरांत पोहोचवण्याची संधी आम्ही सर्वांना उपलब्ध करून देत आहोत. ह्या स्पर्धेतल्या विजेत्यांसाठी अधिवेशन समितीकडून अत्यंत आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहेत! आपल्या प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारिख २९ ऑगस्ट २०१८ आहे.नियम व अटी प्रवेशिका

स्मरणिकेसाठी साहित्य पाठवा

अधिवेशनाच्या स्मरणिकेसाठी आपल्याकडून साहित्य मागवीत आहोत! उत्तर अमेरिकेतील मराठी जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरील साहित्य आपल्याकडून हवे आहे. सामाजिक/आर्थिक/शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या मराठी बांधवांची माहिती देणारे लेख अपेक्षित आहेत. प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या पण निरलसपणे समाजकार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांची माहितीही संकलित करायची आहे. तर मग, उचला आपली लेखणी आणि करा आपल्या प्रतिभेचा आविष्कार! ललित, स्फुट, प्रवासवर्णन, विचारप्रवर्तक लेख, कविता या प्रकारचे साहित्य प्राधान्याने स्विकारले जाईल. साहित्य स्वीकारण्याची अंतिम तारीख जाहीर होण्याची वाट न बघता, आपले साहित्य आपण पाठवायला सुरुवात करू शकता!

नियम व अटी साहित्य