या अधिवेशनात मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबर काही सामाजिक कार्ये आणि अमेरिकेतील तसेच महाराष्ट्रातील मराठी समाजाचे प्रश्न घेऊन त्यावर काही उपक्रम सुरु करता येतील का हा एक उद्देश आमच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच होता. महाराष्ट्र फौंडेशन, बृहन महाराष्ट्र मंडळ आणि डॅलस फोर्टवर्थ मंडळाच्या सहकार्याने NGO summit ही संकल्पना पुढे आली आणि आम्ही तत्परतेने त्या दृष्टीने पावलेही उचलली. आपल्या अधिवेशनात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच होत आहे. यात पाणी फौंडेशन, मराठी विज्ञान परिषद, हेलो मेडिकल फौंडेशन अशा काही स्वयंसेवी संस्था भाग घेणार आहेत