प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. रवीन थत्ते हे प्रमुख वक्ते म्हणून या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेत काही वर्षे वास्तव्य केल्यानांतर ते भारतात परतले आणि प्लास्टिक सर्जरी करता करता भारतीय तत्त्वज्ञानाकडे आकर्षले गेले. त्यांनी ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करून प्राचीन मराठी भाषेत लिहिलेल्या ओव्यांचे इंग्रजी भाषांतर  केले आहे. लोकसत्ता आणि आणि  महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी आधुनिक शोधांच्या संदर्भात भारताच्या प्राचीन साहित्याचे महत्व लक्षात घेऊन स्तंभ लिहिले आहेत.