या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी ,जोपासण्यासाठी, आणि तो वाढवण्यासाठी ज्या अनेक थोर व्यक्तींनी अपार परिश्रम घेतले, अशांची आठवण रामदास स्वामींच्या ह्या ओळी करून देतात. अशा गौरवास्पद व्यक्तींच्या स्मरणार्थ आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी डॅलस येथे होणाऱ्या १९व्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात, जुलै १३, २०१९ रोजी एक भव्य स्वरूपाची गौरवयात्रा डॅलस फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाने आयोजिली आहे.

ही गौरवयात्रा ३ विभागांमध्ये आखली गेली आहे. महाराष्ट्र धर्म संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजां पासून ते, समाजाला योग्य दिशा दाखवणारे संत, थोर साहित्यिक, अशा काही व्यक्तिमत्त्वांना या यात्रेच्या माध्यमातून गौरवण्यात येईल.

महाराष्ट्र धर्म हा राहिला – शिव छत्रपती कारणे,  तो विस्तारिला – महाराष्ट्रप्रेमीं कारणे, आणि आज ज्यांनी परदेशात राहूनही महाराष्ट्र धर्म न सोडिला अशा आपणां सर्वांच्या कारणे….

ह्या गौरव यात्रेत सामील होणार आहेत अमेरिकेतील ढोल ताशा पथके. जवळ जवळ ५० ढोल, १० ताशे, १०० लेझीम यात भाग घेत आहेत. आपणा सर्वांनी ह्या गौरवयात्रेत सहभागी होऊन त्याची शोभा अजूनही वाढवावी.

If you wish to participate in the Gauravyatra, please CLICK HERE to submit your details