December 2018

नमस्कार मंडळी!
 
या दिवाळीत BMM २०१९ च्या आमच्या समितीने लॉस अँजेलिस, अटलांटा, टल्सा, डेट्रॉईट, ऍन आर्बोर आणि नॉर्फोक व्हर्जिनिया या मंडळांना भेटी दिल्या आणि सर्वच ठिकाणी तिथल्या सभासदांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद तर दिलाच आणि अधिवेशनाला येण्याची तीव्र इच्छा आणि तयारीही दर्शवली. अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हा सर्वांना अजून जोमाने काम करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करत आहे. 
ढोल ताशा स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत आता संपलेली आहे आणि सांगताना अतिशय आनंद होत आहे की ढोल ताशा पथकांनी यासाठी उत्तम प्रतिसाद दिला आहे. तर तयार व्हा अमेरिकेतील पहिली वाहिली ढोल ताशा स्पर्धा अनुमभावण्यासाठी. याचबरोबर इतर स्पर्धांसाठी प्रवेशिका अजूनही येत आहेत. अमेरिकेतील मराठी कलाकुशलता या स्पर्धांच्या माध्यमातून लवकरच मराठी जगतासमोर प्रदर्शित होणार यात मुळीच शंका नाही.
आता वळूयात अधिवेशनातील कार्यक्रमांकडे.. सर्व वयोगटातील लोकांसाठी कार्यक्रमाची रूपरेषा आखताना नेहेमीचेच  उत्कृष्ट दर्जाचे नाटक, संगीत, नृत्य अशा प्रकारचे कार्यक्रम तर आम्ही ठरवत आहोतच पण त्याबरोबर आपल्या मराठी परंपरेबद्दलचा आदर किंचितही कमी न होऊ देता, या देशातच राहून, येणाऱ्या पिढीचे नवे  विचार, नव्या पद्धती यांना यापुढे वाव द्यावा व त्यांनाही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहित करावे असाही एक दृष्टिकोन आम्ही ठेवला आहे.  म्हणूनच “सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे” ह्या प्रेरणादायी घोषवाक्याला स्मरून आमची अधिवेशनासाठीची तयारी खेळीमेळीने आणि धडाडीने चालू आहे. बीएमेम अधिवेशनाला आता फक्त आठ महिने राहिले आहेत. हा काळही हां हां म्हणता सरून जाईल! पण या महिन्यात उत्साहाचे विशेष वारे निर्माण झाले आहे ते  निश्चित होत आलेल्या कार्यक्रमांमुळे. आपणां सर्वांसाठी विविधरंगी कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही ठरवली आहे.  येत्या काही आठवड्यातच आम्ही एकेका  कार्यक्रमाची  माहिती  फेसबुकवर आणि ईमेल द्वारे घोषित करत जाऊ.  फेसबुकवर तर रोज नवनवीन घोषणा होत आहेत आणि तुमची उत्सुकता आम्ही जाणून आहोत.
**** अधिवेशनसाठीची नोंदणी १५ डिसेंबर रोजी सुरु ****
आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आम्ही अधिवेशनासाठीची नोंदणी व्यवस्था  (रेजिस्ट्रेशन) १५ डिसेंबर २०१८ रोजी अधिवेशनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करत आहोत!  अधिवेशनासाठीची तिकिटे मर्यादित कालावधीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. सवलतीच्या  दराचा काळ हा मर्यादित राहणार असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आम्ही सर्व डॅलसकर आणि अधिवेशनाचे आयोजक आपणा सर्वांची आतुरतेने वाट पहात आहेत आणि हा जागतिक स्तरावरचा मराठी सोहळा साजरा करण्यासाठी तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. हा जगन्नाथाचा रथ आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हा रथ ओढणे शक्यच नाही.
तर मग मंडळी आता वाट पाहू नका ‘ताई दादा अक्का, डॅलसला यायचा विचार करा पक्का‘ !!!
अधिक माहितीसाठी www.bmm2019.org अथवा www.facebook.com/bmm2019 संपर्क साधावा किंवा contact@bmm2019.org वर ईमेल पाठवावी.
दर महिन्याला हे अधिवेशनाचे वृत्त तुम्हाला देताना आमच्या कामाचा आढावा आपोआपच घेतला जातो आणि त्यांचा वेग पाहून आमचा उत्साह शतगुणित होतो. आपली तरुण मंडळी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीही भरीव कार्यक्रमाची तयारी जोरात सुरु आहे. त्याचा आढावा खाली आहेच.
तुम्हा सर्वांचा असाच पाठिंबा आणि लोभ असावा!  आता परत भेटू पुढच्या महिन्यात!
–  हर्षद खाडीलकर, सहसंयोजक, BMM २०१९
—————————————————————————————————————————
“वय मोठं गंमतीचं” चला घ्या पेन हाती!
 
“उत्तररंग” ची तयारीही जोरात सुरु आहे आणि जवळपास संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ह्यावेळी उत्तररंग चे आकर्षण ठरणारी एक लघुलेख स्पर्धा संयोजन समितीने जाहीर केली आहे...”वय मोठं गंमतीचं“. स्पर्धेच्या नावाप्रमाणे, उतार वयात घडणाऱ्या विविध गंमतीजमती शब्दबध्द करण्याची संधी यानिमित्ताने तुमच्यातील लेखकाला मिळणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या किंवा तुमच्या आजूबाजूला असेलेल्या ज्येष्ठांच्या आयुष्यात घडलेल्या किंवा अगदी काल्पनिक घटना सुध्दा तुम्ही शब्दबद्ध करून लघुलेख पाठवू शकता.अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर, कधी कधी विसरभोळेपणामुळे काही गमती होतात. गप्पांमध्ये तरुणांचा असलेला context आणि ज्येष्ठांचा त्याबाबतीतला जुना context ह्यातील फरकामुळेही बऱ्याच वेळा गमती होत असतात. भारतातून आजी आजोबा नातवांना भेटायला येतात आणि आजी-आजोबा आणि नात किंवा नातू यांचा संवाद, त्यातून आजी-आजोबा नवीन पिढीला कसे शिकवतात आणि उलट नवीन पिढी त्यांना आजकालच्या happening गोष्टी कशी शिकवते, हे तर आपण घरोघरी पाहतो.. खूप गंमतीशीर असतो हा सगळा सोहळा… बघू या .. तुम्ही या सोहळ्याकडे कसे पाहता ते..मुळात मुद्दा काय आहे ? ह्या सगळ्याकडे तुम्ही कपाळावर आठी आणून पाहता की गालातल्या गालात हसून? आयुष्याचा आनंद घ्यायला ना वयाची अट आहे ना प्रसंगांची.. अट फक्त एकच.. आनंदी राहायची आणि छोट्या छोट्या प्रसंगात आनंद शोधण्याची.
मग काय.. घ्या पेन आणि कागद हाती… का keyboard घेताय ? ते तर उत्तम.. न जाणो घडलेले प्रसंग डोळ्यासमोर आणताना कदाचित आधी न जाणवलेली गंमत  तुम्हाला ह्यानिमित्ताने जाणवेल आणि तुमचा दिवस आणखी सुखद करून जाईल..१५ जानेवारी २०१९ ही आपले लेख पाठवण्याची अंतिम तारीख आहे. सर्व स्पर्धकांनी आपले लेख vmg.uttarrang@bmm2019.org ह्या ई-मेल ला पाठवावेत. पहिल्या ५ विजेत्यांचे लघुलेख BMM २०१९ च्या स्मरणिकेत प्रकाशित केले जातील तसेच पहिल्या ३ लघुलेखाच्या लेखकांना उत्तररंग मध्ये आपल्या लघुलेखांचे अभिवाचन करण्याची संधी मिळेल.
राहुल पाडळीकर 
—————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————-
YAY- building friendship through culture
The Young Adults Committee is responsible for organizing programming for attendees aged 18-30. Our mission is to cultivate a fun and memorable experience for our guests throughout the weekend. We hope to achieve this goal by not only celebrating Marathi culture through dance and music showcases but helping our attendees build lasting connections with each other by showing them around our favorite spots in Dallas! Our committee is made up of young professionals and students around the Dallas area who share the same goal of coming together through Marathi culture and building friendships while enjoying what Dallas has to offer. We’ve had an amazing experience at BMM and we can’t wait to share it with a great group of young adults at the 2019 BMM!
Sharvari Gangal