BMM President's Message

 

Avinash Padhye

 

 

 

 

 

नमस्कार मित्रहो,

मी अविनाश पाध्ये, बृहन महाराष्ट्र मंडळाच्या १९व्या अधिवेशनाच्या संकेत स्थळावर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो.  ३८ वर्षांची परंपरा लाभलेलं आपलं बृहन महाराष्ट्र मंडळ हे जगातील महाराष्ट्र राज्याबाहेरचं सर्वात मोठ मंडळ आहे ही आपणा सर्वांसाठी निश्चीतच मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे

इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे जग अधिकाधीक जवळ येत चाललंय. ग्लोबलायझेशनमुळे नकाशावरच्या रेषा धुसर होत चालल्याहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर कवी केशवसुतांनी म्हंटल्या प्रमाणे

“जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत

सर्वत्र खुणा माझ्या घरच्या दिसताहेत”

ह्याची प्रचिती देणारी, आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा वारसा सांगणारी १८ अधिवेशनांची परंपरा उत्तर अमेरिकेत आजही मोठ्या दिमाखात चालू आहे ही वस्तुस्थिती बरच काही सांगून जाते. 

तोच  जिव्हाळा, तीच आत्मियता  पून्हा अनुभवता यावी, अभिनवतेचे नाते सांगणारी आपली उज्वल परंपरा अशीच पुढे चालू ठेवावी ह्या उद्देशानं शेकडो कार्यकर्ते ह्या यज्ञकार्यात सामील झाले आहेत.  ह्या आनंद सोहोळ्यात आपण सहकुटूंब सहपरिवार सहभागी व्हावं त्या प्रित्यर्थ हे आग्रहाचं निमंत्रण.

तेव्हा भेटूया २०१९च्या जुलै महिन्यात डॅलसला .

कळावे

लोभ असावा ही विनंती

अविनाश पाध्ये

अध्यक्ष

बृहन महाराष्ट्र मंडळ